Author name: Samadhan Shiketod

डायरी राघुच्यावाडीची

विमानवारी

जि.प.उस्मानाबाद (धाराशिव) मार्फत श्रीहरीकोट्टा,आंध्रप्रदेश येथे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची विमानाने विज्ञान सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची निवड परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय परीक्षा आयोजित केलेली आहे. पहिला केंद्रस्तरीय परीक्षेचा टप्पा पूर्ण झाला असून या परीक्षेत चिलवडी केंद्रातून जि.प.प्रा.शाळा राघुचीवाडी शाळेतील सात विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. केंद्रात सर्वात जास्त विद्यार्थी राघुचीवाडी शाळेतील विद्यार्थी […]

कुसुमाग्रज जयंती, डायरी राघुच्यावाडीची, मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन

२७ फेब्रुवारी रोजी जि.प.प्रा.शाळा राघुचीवाडी या शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक, कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे मुख्याध्यापक श्री.महादेव थोरात यांनी भुषवले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री.नितीन तावडे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दर्लिंग बेलदार, सदस्य

#बालसाहित्य #जादुई_जंगल #पुरस्कार #childrenLiterature #बालकादंबरी #room_to_read #storytelling #storyweaver

जादुई जंगल बालकांदबरीला बालसाहित्य पुरस्कार मिळाला

जादुई जंगल या बालकादंबरीला मानाचा प्रसाद बन राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून आनंद होत आहे.  माझ्या बालसाहित्य लेखनाची प्रेरणा ही  मुलेच आहेत.मुलांसोबत काम करताना साहित्याची बीजं सापडतात. मुलांचं जगणं, भावविश्व समजून घेऊन लिहीत गेलो. नवनवीन साहित्यकृतींची निर्मिती होत गेली. या साहित्यकृती मुलांना आवडत आहेत. याचा मनस्वी आनंद होत आहे. जादुई जंगल बालकांदबरीला मिळालेला हा पहिलाच

डायरी राघुच्यावाडीची, लोकसहभाग, शालेय व्यवस्थापन समिती बैठक

बैठक शालेय व्यवस्थापन समितीची

आज शालेय व्यवस्थापन समितीची बैठक खूपच छान झाली. गेले वर्षभर ग्रंथालयावर आधारित उपक्रम राबविण्यात आले होते. त्या उपक्रमांच्या संदर्भात सादरीकरण केले. विद्यार्थी पुस्तक वाचून छान पुस्तक परिचय लिहीत आहेत. इयत्ता चौथी ते आठवीमधील विद्यार्थ्यांनी जवळपास चाळीस पुस्तक परिचय लिहले आहेत. काही विद्यार्थ्यांनी इतकं अप्रतिम लिहलंय की वाचतंच रहावंस वाटतं. शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थीच ग्रंथालयाचं व्यवस्थापन

पुस्तक परिचय

ज्याच्या हाती शून्य होते

आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शाळेत परिपाठात ज्याच्या हाती  शून्य होते या प्रेरणादायी पुस्तकाचा परिचय दिला. पुस्तक परिचय मुलांना खूप आवडला. शाळेतील शिक्षकांनीही पुस्तक खूपच आवडले. आमच्यासाठही प्रती मागवा अशी त्यांनी विनंती केली. ज्याच्या हाती शून्य होते या पुस्तकात यशाच्या शिखरावर पोहचलेल्यांच्या यशोगाथा आहेत. ही असान्य माणसं कधीकाळी सामान्य माणसं होती.त्यांनी कष्टाच्या व जिद्दीच्या बळावर

अभिव्यक्ती, कविता, विद्यार्थी साहित्य संमेलन

विद्यार्थी साहित्य संमेलन येणेगूर

गटशिक्षण कार्यालय उमरगा व अभिजात साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी पाचवे विद्यार्थी साहित्य संमेलन येणेगूर ता.उमरगा या ठिकाणी संपन्न होत आहे. उद्या कविसंमेलाच्या सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. विद्यार्थी खूप छान लिहीत आहेत. प्रसिद्ध साहित्यिक श्री. बालाजी इंगळे व त्यांच्या टिमचे मनापासून अभिनंदन. 

काजवा, पुस्तक परिचय

उजेडाचं आभाळ:काजवा

लेखक पोपट काळे हे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शालेय शिक्षण विभागात एक प्रयोगशील,संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांचं काजवा हे आत्मकथन वाचलं. रावसाहेब भामरे या मित्रानं मला ते भेट दिलं होतं. तसं आत्मकथन हा माझा आवडता साहित्यप्रकार.  जगण्यासाठी व शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्षमयी प्रवास या आत्मकथनाच्या माध्यमातून मांडलेला आहे. हा संघर्ष वाचताना अंगावर रोमांच उभा

डायरी राघुच्यावाडीची, बालिका दिन

बालिका दिन उत्साहात साजरा

आज शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची सुंदर वेशभुषा केली होती. शाळेतील विद्यार्थ्यांनी या निमित्ताने छान भाषणे केली. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची महती सांगणाऱ्या ओव्या गायल्या.  पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांनीही भाषणे केली. शाळेतील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व खूपच छान आहे. अभ्यासपूर्ण

अनुभव, समृद्ध होताना

अधिकारी शिक्षकांना घडवतात,शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात

स्तराधारीत वाचन साहित्य निवड समितीतील सदस्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या ठिकाणी आजपासून कार्यशाळा सुरू झाली आहे. या निमित्ताने आज SCERT मध्ये आलो होतो. आज सकाळी परिविक्षाधिन उपशिक्षणाधिकारी यांच्या वर्गात परिपाठाच्या वेळेस त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.  एक शिक्षक म्हणून माझा शैक्षणिक प्रवास उलगडून दाखवला.  माझ्या घडणीमध्ये पर्यवेक्षिय अधिकाऱ्यांचा किती मोठा वाटा

डायरी राघुच्यावाडीची, सहल

मला डाॅक्टर व्हायचंय!

आमच्या केंद्रातील जि.प.प्रा.शाळा पिंपरी या शाळेची सहल कोकणात गेलीय.त्यामुळे शाळा बंद राहू नये.यासाठी आमच्या शाळेतील शिक्षकांनी तिन दिवस ती शाळा सांभाळावी अशी तात्पुरती व्यवस्था केली होती. आज पहिला दिवस माझा होता. यापुर्वीही अनेकदा त्या शाळेवर शिक्षक परिषदेच्या निमित्ताने जाण्याचा योग आला आहे. आज त्या शाळेवर पोहचलो. दोन तीन मुले दिसली.बरीच मुले सहलीला गेलेली असल्यामुळे शुकशुकाट

Scroll to Top