बैठक शालेय व्यवस्थापन समितीची
आज शालेय व्यवस्थापन समितीची बैठक खूपच छान झाली. गेले वर्षभर ग्रंथालयावर आधारित उपक्रम राबविण्यात आले होते. त्या उपक्रमांच्या संदर्भात सादरीकरण केले. विद्यार्थी पुस्तक वाचून छान पुस्तक परिचय लिहीत आहेत. इयत्ता चौथी ते आठवीमधील विद्यार्थ्यांनी जवळपास चाळीस पुस्तक परिचय लिहले आहेत. काही विद्यार्थ्यांनी इतकं अप्रतिम लिहलंय की वाचतंच रहावंस वाटतं. शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थीच ग्रंथालयाचं व्यवस्थापन […]
