पुस्तक परिचय

पुस्तक परिचय

ज्याच्या हाती शून्य होते

आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शाळेत परिपाठात ज्याच्या हाती  शून्य होते या प्रेरणादायी पुस्तकाचा परिचय दिला. पुस्तक परिचय मुलांना खूप आवडला. शाळेतील शिक्षकांनीही पुस्तक खूपच आवडले. आमच्यासाठही प्रती मागवा अशी त्यांनी विनंती केली. ज्याच्या हाती शून्य होते या पुस्तकात यशाच्या शिखरावर पोहचलेल्यांच्या यशोगाथा आहेत. ही असान्य माणसं कधीकाळी सामान्य माणसं होती.त्यांनी कष्टाच्या व जिद्दीच्या बळावर […]

काजवा, पुस्तक परिचय

उजेडाचं आभाळ:काजवा

लेखक पोपट काळे हे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शालेय शिक्षण विभागात एक प्रयोगशील,संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांचं काजवा हे आत्मकथन वाचलं. रावसाहेब भामरे या मित्रानं मला ते भेट दिलं होतं. तसं आत्मकथन हा माझा आवडता साहित्यप्रकार.  जगण्यासाठी व शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्षमयी प्रवास या आत्मकथनाच्या माध्यमातून मांडलेला आहे. हा संघर्ष वाचताना अंगावर रोमांच उभा

पुस्तक परिचय, प्रकाश आमटे

प्रकाशवाटा

आर्यन इयत्ता आठवीत शिकतोय. दिवाळीच्या सुट्टीत त्यानं प्रकाशवाटा हे पुस्तक वाचलं. त्यानं या पुस्तकाचा लिहलेला परिचय…… पुस्तक परिचय-प्रकाशवाटा ••••••••••••••••••••••••••••••••••• माझ्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या.मी दिवाळीच्या सुट्टीत माझ्या आजोळी म्हणजे मामाच्या गावाला गेलो होतो. पप्पा अवांतर वाचन करण्यासाठी नेहमी प्रेरीत करत असतात. पुस्तक आयुष्याला कलाटणी देऊ शकतं, एक पान एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं, एक वाक्य

पुस्तक परिचय, बालसाहित्य

बालसाहित्य निर्मिती काळाची गरज

गेल्या आठवड्यात प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आदरणीय डाॅ.अभय शहापूरकर यांना माझी मुलांसाठी लिहलेली पोपटाची पार्टी(बालकवितासंग्रह ) व जादूई जंगल (बालकादंबरी) ही पुस्तके भेट दिली होती. आपल्या व्यस्त वेळेतून त्यांनी ही पुस्तके वाचून छान लेखाच्या स्वरूपात अभिप्राय पाठवला आहे. यामुळे निश्चितच बालसाहित्याला पाठबळ व बालसाहित्यिकांना प्रेरणा मिळते. अभिप्राय माझे स्नेही व बालसाहित्यिक श्री. समाधान शिकेतोड सरांनी त्यांची नुकतीच

पुस्तक परिचय, बालकवितासंग्रह परिचय

सुट्टी एके सुट्टी-मंगेश पाडगावकर

सांग सांग बोलानाथ पाऊस पडेल काय? हे गाणे प्रत्येक बालकांच्या लहानपणीची समृद्ध आठवण आहे.मंगेश पाडगावकरांची अशी अनेक कविता,गीते बालमनाला मोहीनी घालतात.त्यांनी मुलांसाठी खूप लेखन केले.त्यांचे बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. सुट्टी एके सुट्टी हा मंगेश पाडगावकर यांचा बालकवितासंग्रह. या बालकवितासंग्रहाच्या सुरूवातीलाच मुलांसाठीच्या कवितांबद्दलची भूमीका स्पष्ट केली आहे.या संग्रहात एकूण तेहतीस कविता आहेत.या बालकवितासंग्रहाची पहिली आवृत्ती मौज प्रकाशन,मुंबई

पुस्तक परिचय

एक संघर्षगाथा: वादळवाट

वादळवाट हे आत्मकथन एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलाचं आहे. या आर्थिक विस्थापित कुटुंबाच्या वाट्याला आलेलं दुःख, दैना, हालअपेष्टा यामुळे खचून न जाता या शेतकऱ्याच्या मुलानं स्वत:च्या बळावर आकाशाला गवसणी घातली. विवेकवाद, माणुसकी, समता, बंधुता यांचा पुरस्कार करून अवघं आयुष्य कुटुंबाच्या, समाजाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी झिजवलं. असे संघर्षयात्री एम. डी. देशमुख यांची ही प्रेरणादायी जीवनगाथा आहे. ग्रंथाली

पुस्तक परिचय

जादुई जंगल-पुस्तक परिचय

गोव्यातील गोवन वार्ता वर्तमानपत्राच्या तरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेला जादुई जंगल या बालकादंबरीचा परिचय पुस्तकाचे नाव – जादुई जंगल  लेखक – समाधान शिकेतोड  प्रकाशक – राजहंस प्रकाशन पुस्तक परिचय – मुग्धा मणेरीकर  लहान मुलांच्या दुनियेत शिरून त्यांचे भावविश्व अनुभवण्यासाठी जादुई जंगल हे एक उत्तम पुस्तक आहे. वयवर्षे चार पासून यातील लहान लहान गोष्टी मुलांना वाचून दाखवता

किशोर मासीक, पुस्तक परिचय

चला किशोर वाचूया

॥पुस्तक परिचय॥ दिवाळी अंक ‘किशोर’ •••••••••••••••••••••••••••••••  बालमित्रांना ‘किशोर’ मासिक खूपच आवडते. बालमित्र किशोर मासीकाची दर महिन्याला वाट पाहत असतात. यावर्षीचा किशोरचा दिवाळी खूपच छान आहे.चंद्रमोहन यांनी आकर्षक असं मुखपृष्ठ काढलेलं आहे.अंकातील चित्रे मनोवेधक आहेत. अंकातील कथा,ललित लेख,कविता यासाठी मुलांच्या भावविश्वातील  चित्रे काढली आहेत. अनिल अवचट,राजीव तांबे,प्रवीण दवणे,दासू वैद्य,दिलीप प्रभावळकर, महावीर जोंधळे, स्वाती राजे,वीरा राठोड,डाॅ.सुरेश सावंत,एकनाथ

पुस्तक परिचय

आनंदाने शिकण्याच्या दिशेने

आपल्या मुलांचे शिकणे अर्थपूर्ण व्हावे असे जगातल्या सर्वच मोठ्या माणसांना वाटते. त्यासाठी शिकण्याची प्रक्रिया ‘मूल’केंद्री असणे, मुलाच्या आजच्या आणि उद्याच्या जगण्याशी जोडलेली असणे आणि महत्त्वाचे म्हणजे ती आनंददायी असणे आवश्यक आहे हे आपण सारेच मानतो. काही प्रयोगशील शाळांचा अपवाद वगळता शिकण्यासाठी असलेल्या सध्याच्या व्यवस्थेत आपली बहुतांश मुले अर्थपूर्ण, सर्जनशील व आनंददायी शिक्षणापासून वंचित आहेत हेही

पुस्तक परिचय

चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये,म्हणून !

माणसाला आयुष्यातला प्रत्येक क्षण समृद्ध करत असतो, फुलवत असतो. आपण सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यासारख्या गोष्टीच्या मागं धावताना  असं समृद्ध होणं,फुलणं विसरून जात असतो.जीवनाचे महत्त्व समजून आपण प्रत्येक क्षण मनापासून जगावा,यासाठी डॉ.आ.ह.साळुंखे यांनी जीवनाचं हे साधं,सरळ तत्वज्ञान आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगातून,अनुभवातून ‘चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून!’ या  पुस्तकातून मांडलेलं आहे. बऱ्याच दिवसापूर्वी ‘चांदण्यात भिजायचं

Scroll to Top