बालिका दिन उत्साहात साजरा

आज शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची सुंदर वेशभुषा केली होती. शाळेतील विद्यार्थ्यांनी या निमित्ताने छान भाषणे केली. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची महती सांगणाऱ्या ओव्या गायल्या. 
पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांनीही भाषणे केली. शाळेतील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व खूपच छान आहे. अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत भाषण करतात.
कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक पालक,शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रेमनाथ जाधव यांनी केले. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.शंकर मोरे यांनी स्वतःच्या कॅमेर्‍यात कार्यक्रमाचे सुंदर फोटो काढले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top