डायरी राघुच्यावाडीची, शालेय व्यवस्थापन समिती

अध्यक्षांचा वाढदिवस

शाळेच्या विकासात शालेय व्यवस्थापन समितीची भूमीका खुपच महत्त्वाची असते.व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून खूप सारे बदल घडवून आणणे शक्य होते. महाराष्ट्रातील बदलत गेलेल्या व इतर शाळांसमोर आदर्श ठेवलेल्या शाळांच्या पाठीशी व्यवस्थापन समितीची उभी राहिलेली दिसून येते.आमच्या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दर्लींग बेलदार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी धडपडत असतात. शाळेला व शिक्षकांना मदत,प्रोत्साहन देत असतात.  अनियमित शाळेत येणाऱ्या […]

प्रयोगशील शिक्षक, फेलोशिप, शरद पवार इन्स्पायर फेलोशिप

प्रयोगशील शिक्षकांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप सन्मानपूर्वक प्रदान

काल यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशीप’चा फेलोशीप प्रदान सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आदरणीय पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ मा. डॉ सी. डी. मायी, आदरणीय सुप्रियाताई सुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.   कृषी,साहित्य, शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना फेलोशिप प्रदान करण्यात आल्या. या गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत

डायरी राघुच्यावाडीची

कचराकुंडी तयार केली

वर्गात, शालेय परिसरात होणारा कचरा कुठं टाकावा हा प्रश्न होता.अगोदरच आमच्या शाळेला भौतिक सुविधांची वाणवा आहे.भौतिक सुविधांनी शाळा समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुलं वह्याची पानं फाडतात त्यामुळं कागद इकडं तिकडं पसरतात. तो कचरा जमा करावा लागतो.तो उघड्यावर जाळावा लागतो.नाही जाळला तर वार्‍याने उडून कागद मैदानावर पसरतात.त्यासाठी कचराकुंडी तयार करावी हा विचार मनात यायचा. 

जादुई जंगल, बालसाहित्य, मुलांनी काय वाचाव?

जादुई जंगल निर्मितीचा प्रवास

 मी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून मुलांसोबत काम करत आहे. मुलांसोबत काम करण्याचा आनंद काही औरच असतो. मुलांसोबत गप्पागोष्टी करणे, त्यांना गोष्टी, सांगणे, कविता गाऊन दाखविणे,त्यांना पुस्तके वाचून दाखवणे, एखादी नाटिका बसविणे असे शालेय उपक्रम शाळेत राबवित असतो. मी सांगितलेल्या गोष्टी मुलांना खूप आवडतात. मुले गोष्टी सांगण्याचा आग्रह धरतात. मी भूम तालुक्यात २००९ साली

उपक्रम, डायरी राघुच्यावाडीची

राघुचीवाडी शाळेत बालआनंद मेळावा संपन्न

माजी शिक्षण संचालक वि.वि. चिपळूणकर यांनी असे म्हटले हे की ‘शाळा हे उपक्रमांचे मोहोळ बनायला हवे’. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी शाळेत विविध सहशालेय उपक्रम, प्रकल्प राबविण्यात येत असतात. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी जीवन व्यवहारातील ज्ञान,कौशल्य मिळवीत असतात. त्यांचं शिकणं आणि जगणं एक होत असतं. अशा उपक्रमांच्या माध्यमातून विविध विषयांमधील विद्यार्थ्यांच्या

उपक्रम

राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा

उस्मानाबाद येथे राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा सुरू आहेत. खो खो च्या राष्ट्रीय स्पर्धा प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य मिळतंय. अतिशय उत्साहात स्पर्धा संपन्न होत आहेत. काल आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही सकाळच्या सत्रातील दोन सामने दाखवले. मुलांना खूप आनंद मिळाला. मा.रामलिंग काळे, शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प. उस्मानाबाद यांनीही आमच्या मुलांसोबत सामन्याचा आस्वाद घेतला. खो-खो चा केरळ×महाराष्ट्र हा रंगतदार सामाना

पुस्तक परिचय, प्रकाश आमटे

प्रकाशवाटा

आर्यन इयत्ता आठवीत शिकतोय. दिवाळीच्या सुट्टीत त्यानं प्रकाशवाटा हे पुस्तक वाचलं. त्यानं या पुस्तकाचा लिहलेला परिचय…… पुस्तक परिचय-प्रकाशवाटा ••••••••••••••••••••••••••••••••••• माझ्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या.मी दिवाळीच्या सुट्टीत माझ्या आजोळी म्हणजे मामाच्या गावाला गेलो होतो. पप्पा अवांतर वाचन करण्यासाठी नेहमी प्रेरीत करत असतात. पुस्तक आयुष्याला कलाटणी देऊ शकतं, एक पान एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं, एक वाक्य

ग्रेट भेट, चंदनाचे हात, पुस्तक भेट, फारूक काझी

चंदनाचे हात

प्रिय फारूक सर यांना कु.प्राची काळे हीच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आज पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. फारूक सरांनी आपल्या मनोगतातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. खूपच अभ्यासपूर्ण मांडणी केली.बालसाहित्य, पालकत्व, मुलांची अभिव्यक्ती यावर भाष्य केले. बर्‍याच दिवसांनी मित्राची भेट झाली होती.बालसाहित्यावर चर्चा केली. फारूकनं मला प्रसिद्ध साहित्यिक,व्याख्याते श्री. यशवंत

पुस्तक प्रकाशन

मुलं लिहती होत आहेत

मुलं लिहती होत आहेत मुलांच्या अभिव्यक्तीला धुमारे फुटत आहेत. राज्यातील अनेक शालेय विद्यार्थ्यी लिहती होत आहेत. कविता,दैनंदिनी,कथा इत्यादी लेखन करत आहेत. इयत्ता सहावीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात इयत्ता सहावीच्या विद्यार्थीनीची कविता आलेली आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांचे अंगभूत कलागुणांना पाठबळ द्यायला हवं.प्राचीच्या वडीलांनी तिच्या सर्जनशीलतेला ओळखून पाठबळ दिल्यामुळे हा सुंदर कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. इयत्ता आठवीमध्ये शिकणारी

डायरी राघुच्यावाडीची

ॠच्याचं चित्र

काल इयत्ता चौथीतील ॠचानं एक छान चित्र काढून दाखवलं.दिवाळी कशी साजरी केली?या संदर्भात चित्र होतं. या चित्रात तिनं घर,पणत्या,आकाशकंदील,ती अन् तिचा भाऊ असं काढलेलं होतं. पण तिच्या चित्राला पाय दिसत नव्हते.मग मी तिला विचारलं, “अगं चित्राला पाय दिसत नाहीत.” त्यावर ती म्हणाली,” अहो सर,पाय झाकून गेलेत.” मुलं कशी विचार करतात. किती चिकित्सक व सर्जनशील पातळीवर

Scroll to Top