पुस्तक प्रकाशन

पुस्तक प्रकाशन

मुलं लिहती होत आहेत

मुलं लिहती होत आहेत मुलांच्या अभिव्यक्तीला धुमारे फुटत आहेत. राज्यातील अनेक शालेय विद्यार्थ्यी लिहती होत आहेत. कविता,दैनंदिनी,कथा इत्यादी लेखन करत आहेत. इयत्ता सहावीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात इयत्ता सहावीच्या विद्यार्थीनीची कविता आलेली आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांचे अंगभूत कलागुणांना पाठबळ द्यायला हवं.प्राचीच्या वडीलांनी तिच्या सर्जनशीलतेला ओळखून पाठबळ दिल्यामुळे हा सुंदर कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. इयत्ता आठवीमध्ये शिकणारी […]

अतुल कुलकर्णी, ग्रेट भेट, पुस्तक प्रकाशन

सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांची भेट

आदरणीय नीलेश निमकर सर यांच्या शिकता शिकविता या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा ३ नोव्हेंबर रोजी पुण्यात संपन्न झाला. मला या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक, प्रसिद्ध चरित्रलेखिका  वीणा गवाणकर, प्रसिद्ध सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी यांना ऐकता आले. अतुल कुलकर्णी हे आपल्याला सिनेअभिनेते म्हणून परिचित आहेतच.त्याचबरोबर त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद आहे. क्वेस्ट संस्थेच्या

पुस्तक प्रकाशन

शिकता शिकविता

आज पुण्यात शिक्षण अभ्यासक,क्वेस्ट संस्थेचे संचालक आदरणीय नीलेश निमकर यांचे शिकता शिकविता या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध चरित्रलेखिका वीणा गवाणकर, सिनेअभिनेते अतुल कुलकर्णी, शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक, समकालीन प्रकाशनाचे प्रकाशक आनंद अवधानी या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.  हा सोहळा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. अतिशय सुंदर, देखण्या व शिक्षणविषयक जाणीवा समृद्ध करणाऱ्या या कार्यक्रमात

book, जादुई जंगल, पुस्तक प्रकाशन

समाधान शिकेतोड यांच्या जादुई जंगल बालकादंबरीचे प्रकाशन संपन्न झाले

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, बालसाहित्यिक समाधान शिकेतोड यांच्या जादुई जंगल या बालकादंबरीचे प्रकाशन शिवगौरी हॉल या ठिकाणी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे, प्रसिद्ध साहित्यिक,डॉ.बालाजी इंगळे, वरिष्ठ अधिव्याख्याता, डॉ. दयानंद जटनुरे,मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष नितीन तावडे,अधिव्याख्याता नारायण मुदगलवाड, यांच्या हस्ते संपन्न झाले.  जादुई जंगलातील गंमतीजमती सांगणारी, रोमहर्षक,मनोरंजक  बालकादंबरी राजहंस प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेली आहे.योगीता धोटे यांनी

जादूई जंगल, पुस्तक प्रकाशन

आता प्रतिक्षा संपली…

 राजहंस प्रकाशनाकडून पाठवलेले कुरीअर मिळालं.माझी जादूई जंगल ही बालकांदबरी पाहण्यासाठी मी उत्सुक होतो.  या बालकांदबरीच्या लेखकासाठीच्या भेट प्रती मिळाल्या.पुस्तक खुपच सुंदर झालंय.राजहंसच्या संपूर्ण टिमनं खूप मेहनत घेतली आहे.योगीता धोटे यांनी काढलेलं मुखपृष्ठ व आतील चित्रे मन वेधून घेतात. सोबतच आदरणीय सदानंद बोरसे सरांचं अभिनंदन पत्रही मिळालं.पत्र वाचून नवीन उर्जा मिळाली. आता प्रतिक्षा संपली…. लवकर पुस्तक

पुस्तक प्रकाशन

समाधान शिकेतोड यांच्या चला कोरोनामुक्त होऊया पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मा.डॉ.गणपत मोरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.नितीन तावडे, सेवानिवृत्त वरिष्ठ अधिव्याख्याता मा.श्री.नवनाथ धुमाळ, वरिष्ठ अधिव्याख्याता मा.डॉ.दयानंद जटनुरे या मान्यवरांच्या हस्ते समाधान शिकेतोड लिखित चला कोरोनामुक्त होऊया या पुस्तकाचे प्रकाशन आज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सभागृहात संपन्न झाले.  याप्रसंगी शिक्षण उपसंचालक मा.डाॅ.गणपत मोरे यांनी या पुस्तकाबद्दल आपले प्रेरणादायी विचार व्यक्त करून

पुस्तक प्रकाशन

समाधान शिकेतोड यांच्या “पोपटाची पार्टी” या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

समाधान शिकेतोड यांच्या “पोपटाची  पार्टी” या बालकवितासंग्रहाचे  प्रकाशन  मा.डॉ.संजय कोलते,मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.विवेक जॉन्सन,परिविक्षाधीन जिल्हाधिकारी,मा.अनुप शेंगुलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.डाॅ.संजय तुबाकले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी,मा.अजिंक्य पवार,उपमुख्यकार्यकारी अधिकारी, मा.डाॅ.इब्राहिम नदाफ,प्राचार्य,डायट मा.रोहीणी कुंभार,उपशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे खातेप्रमुख,शिक्षण विभाग व डायटमधील अधिकारी व विषय सहायक उपस्थित होते. याप्रसंगी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कवितासंग्रहाला शुभेच्छा दिल्या

पुस्तक प्रकाशन

रचनावाद

ज्ञानरचनावादाची रूजवणूक ज्यांनी महाराष्ट्रात केली अन् संपूर्ण बीट ज्ञानरचनावादी केले.त्या सातारा जिल्ह्यातील कुंमठे बीट च्या प्रयोगशील  शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे मॅडम मिरज तालुक्यातील शाळा रचनावादी बनवणारे व महाराष्ट्रात पहिले बालसाहित्य संमेलन घेणारे प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांनी “रचनावाद” या पुस्तकाचे संपादन केले आहे. हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. याचा आनंद वाटला. आपल्याला हे

Scroll to Top