डायरी राघुच्यावाडीची

डायरी राघुच्यावाडीची, विज्ञान सहल, विमानभरारी

विमानभरारी श्रीहरीकोटा

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. संशोधनवृत्तीचा विकास व्हावा. विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी. शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी. याहेतूने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची अंतरिक्ष केंद्र,श्रीहरिकोटा येथे विमानाने विज्ञान सहल आयोजित केली जाणार आहे.  या विज्ञान सहलीसाठी जि.प.प्रा.शाळा राघुचीवाडी या शाळेतील प्रतिभावंत, प्रज्ञावंत,सर्जनशील विद्यार्थ्यींनी कु. भक्ती दर्लिंग बेलदार हीची […]

डायरी राघुच्यावाडीची

राघुचीवाडी येथे शहीद जवान आनंद गेजगे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे व स्मारकाचे अनावरण सोहळा संपन्न

शहीद जवान आनंद गेजगे गडचिरोली (अहेरी) या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) कार्यरत असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरूंग स्फोटात त्यांना विरमरण आले होते. त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे व स्मारकाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.आमदार कैलास पाटील, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडन्ट मा.विशाल कोरे, माजी नगरसेवक

डायरी राघुच्यावाडीची

विमानवारी

जि.प.उस्मानाबाद (धाराशिव) मार्फत श्रीहरीकोट्टा,आंध्रप्रदेश येथे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची विमानाने विज्ञान सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची निवड परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय परीक्षा आयोजित केलेली आहे. पहिला केंद्रस्तरीय परीक्षेचा टप्पा पूर्ण झाला असून या परीक्षेत चिलवडी केंद्रातून जि.प.प्रा.शाळा राघुचीवाडी शाळेतील सात विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. केंद्रात सर्वात जास्त विद्यार्थी राघुचीवाडी शाळेतील विद्यार्थी

कुसुमाग्रज जयंती, डायरी राघुच्यावाडीची, मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन

२७ फेब्रुवारी रोजी जि.प.प्रा.शाळा राघुचीवाडी या शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक, कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे मुख्याध्यापक श्री.महादेव थोरात यांनी भुषवले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री.नितीन तावडे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दर्लिंग बेलदार, सदस्य

डायरी राघुच्यावाडीची, लोकसहभाग, शालेय व्यवस्थापन समिती बैठक

बैठक शालेय व्यवस्थापन समितीची

आज शालेय व्यवस्थापन समितीची बैठक खूपच छान झाली. गेले वर्षभर ग्रंथालयावर आधारित उपक्रम राबविण्यात आले होते. त्या उपक्रमांच्या संदर्भात सादरीकरण केले. विद्यार्थी पुस्तक वाचून छान पुस्तक परिचय लिहीत आहेत. इयत्ता चौथी ते आठवीमधील विद्यार्थ्यांनी जवळपास चाळीस पुस्तक परिचय लिहले आहेत. काही विद्यार्थ्यांनी इतकं अप्रतिम लिहलंय की वाचतंच रहावंस वाटतं. शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थीच ग्रंथालयाचं व्यवस्थापन

डायरी राघुच्यावाडीची, बालिका दिन

बालिका दिन उत्साहात साजरा

आज शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची सुंदर वेशभुषा केली होती. शाळेतील विद्यार्थ्यांनी या निमित्ताने छान भाषणे केली. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची महती सांगणाऱ्या ओव्या गायल्या.  पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांनीही भाषणे केली. शाळेतील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व खूपच छान आहे. अभ्यासपूर्ण

डायरी राघुच्यावाडीची, सहल

मला डाॅक्टर व्हायचंय!

आमच्या केंद्रातील जि.प.प्रा.शाळा पिंपरी या शाळेची सहल कोकणात गेलीय.त्यामुळे शाळा बंद राहू नये.यासाठी आमच्या शाळेतील शिक्षकांनी तिन दिवस ती शाळा सांभाळावी अशी तात्पुरती व्यवस्था केली होती. आज पहिला दिवस माझा होता. यापुर्वीही अनेकदा त्या शाळेवर शिक्षक परिषदेच्या निमित्ताने जाण्याचा योग आला आहे. आज त्या शाळेवर पोहचलो. दोन तीन मुले दिसली.बरीच मुले सहलीला गेलेली असल्यामुळे शुकशुकाट

डायरी राघुच्यावाडीची, शालेय व्यवस्थापन समिती

अध्यक्षांचा वाढदिवस

शाळेच्या विकासात शालेय व्यवस्थापन समितीची भूमीका खुपच महत्त्वाची असते.व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून खूप सारे बदल घडवून आणणे शक्य होते. महाराष्ट्रातील बदलत गेलेल्या व इतर शाळांसमोर आदर्श ठेवलेल्या शाळांच्या पाठीशी व्यवस्थापन समितीची उभी राहिलेली दिसून येते.आमच्या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दर्लींग बेलदार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी धडपडत असतात. शाळेला व शिक्षकांना मदत,प्रोत्साहन देत असतात.  अनियमित शाळेत येणाऱ्या

डायरी राघुच्यावाडीची

कचराकुंडी तयार केली

वर्गात, शालेय परिसरात होणारा कचरा कुठं टाकावा हा प्रश्न होता.अगोदरच आमच्या शाळेला भौतिक सुविधांची वाणवा आहे.भौतिक सुविधांनी शाळा समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुलं वह्याची पानं फाडतात त्यामुळं कागद इकडं तिकडं पसरतात. तो कचरा जमा करावा लागतो.तो उघड्यावर जाळावा लागतो.नाही जाळला तर वार्‍याने उडून कागद मैदानावर पसरतात.त्यासाठी कचराकुंडी तयार करावी हा विचार मनात यायचा. 

उपक्रम, डायरी राघुच्यावाडीची

राघुचीवाडी शाळेत बालआनंद मेळावा संपन्न

माजी शिक्षण संचालक वि.वि. चिपळूणकर यांनी असे म्हटले हे की ‘शाळा हे उपक्रमांचे मोहोळ बनायला हवे’. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी शाळेत विविध सहशालेय उपक्रम, प्रकल्प राबविण्यात येत असतात. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी जीवन व्यवहारातील ज्ञान,कौशल्य मिळवीत असतात. त्यांचं शिकणं आणि जगणं एक होत असतं. अशा उपक्रमांच्या माध्यमातून विविध विषयांमधील विद्यार्थ्यांच्या

Scroll to Top