Author name: Samadhan Shiketod

डायरी राघुच्यावाडीची

सूक्ष्मदर्शकातून काय दिसतंय ?

सूक्ष्मदर्शक हे डोळ्यांना प्रत्यक्ष न दिसणारी सूक्ष्म वस्तू पाहण्याचे उपकरण आहे.विज्ञानाच्या अनेक शोधांमध्ये सूक्ष्मदर्शकाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सूक्ष्मदर्शकातून वेगवेगळ्या स्लाईड दाखविल्या. मुलांनी त्या स्लाईड कुतूहलाने पाहिल्या. सूक्ष्मदर्शकातून अतिसूक्ष्म बाबी मोठ्या दिसत होत्या. ते पाहून मुलांना खूप आनंद वाटला.

डायरी राघुच्यावाडीची

इंग्रजी वर्तमानपत्र पाहिलंय का?

मुलांना विचारलं, “तुम्ही इंग्रजी वर्तमानपत्र पाहिलं का?” मुलं म्हणाले,”नाही.”  मुलांना इंडियन एक्सप्रेस इंग्रजी वर्तमानपत्र दाखवलं. मुलं कौतुकान हे वर्तमानपत्र पाहू लागले. मुलांना हे वर्तमानपत्र वाचायला दिलं. मुलं बातम्यांची शीर्षक वाचण्याचा प्रयत्न करू लागली. ओळखीचे शब्द शोधू लागली. वर्तमानपत्रातील चित्र पाहू लागली. काही वाक्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागली.मुलांनी इंग्रजी वर्तमानपत्र वाचण्याचा आनंद घेतला.

Baramati, Innovation, उपक्रम, फेलोशिप

घरोघरी ग्रंथालय

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई मार्फत राज्यातील प्रयोगशील शिक्षकांना पाठ्यवृत्ती (फेलोशिप) दिली जाते. या सर्व फेलोंची तीन दिवसीय कार्यशाळा बारामती येथे संपन्न झाली. राज्यातील प्रयोगशील शिक्षकांचे उपक्रम समजून घेता आले. बालाजी जाधव सातारा, विनीत पद्मावार गडचिरोली, सचिन देसाई कोल्हापूर, अण्णासाहेब घोडके बीड, मृणाल गांजळे पुणे अशा अनेक प्रयोगशील शिक्षकांचे उपक्रम अफलातून आहेत. या सर्वांचे सादरीकरण अनुभवता

डायरी राघुच्यावाडीची

किशोरचा दिवाळी अंक आला

आमच्या शाळेतील मुलांसाठी आम्ही किशोरचे ४१ विद्यार्थ्यांची किशोर मासिकाची वर्गणी भरली होती. दर महिन्याला हे अंक नियमित मिळत आहेत. हे अंक मुले आवडीने वाचतात. किशोरचा दिवाळी अंकाची मुले आतुरतेने वाट पाहत होती. एकदाचे हे अंक आले. अंक पाहून मुले खुश झाली. या वर्षीचा दिवाळी अंक जीवनकौशल्यावर आधारित आहे. अंकातील बालसाहित्य वाचायला मुले उत्सुक होती. बालदिनाच्या

childrenliterature, बालसाहित्य, हाती_ज्यांच्या_शून्य_होते

हाती ज्यांच्या शून्य होते:प्रेरणादायी पुस्तक

आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त हाती ज्यांच्या शून्य होते या पुस्तकाचा परिचय परिपाठाला करून दिला होता.परिचय ऐकून मुलांना पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली.  हे खूप प्रेरणादायी पुस्तक आहे. मुलांना नक्की वाचायला द्यायला हवं.

Uncategorized

शिक्षक म्हणून 20 वर्षे सेवा पूर्ण

प्राथमिक शिक्षक म्हणून २० वर्षे सेवा पूर्ण झाली. २००३ ते २०२३ हा शिक्षक म्हणून प्रवास आनंदायी आहे.मुलांसोबत सर्जनशील काम करता आलं.  नौकरीच्या सुरूवातीलाच नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागात केलं. बहुभाषिक शिक्षणाचं आव्हानात्मक काम करताना बोलीभाषा-प्रमाणभाषा शब्दकोश तयार केला. यामुळे मुलांना घरच्या भाषेकडून माध्यम भाषेकडे घेऊन जाता आले. यावेळी टिचर पुस्तकाकडून प्रेरणा मिळाली अन् काम करत गेलो.

शिक्षणाचा अधिकार

आम्ही आत्मकेंद्रित होत आहोत काय?

काल घरासमोरून कचरा वेचणारी एक स्त्री व सहा-सात वर्षाची मुलगी जाताना दिसली. दोघींच्या अंगावर कळकटलेले कपडे होते. त्या दोघींच्या पाठीवर कचऱ्याची पोतडी होती. रस्त्यावर कुठं काही प्लास्टिक दिसतंय का त्यावर नजर टाकत त्या दोघी चालल्या होत्या. ती मुलगी शाळाबाह्य असेल म्हणून मला काही राहवलं नाही. त्या महिलेला विचारलं अहो ती शाळेत जात नाही का? ती

विज्ञान शैक्षणिक सहल, विमानभरारी

विज्ञान शैक्षणिक सहल

आमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची विज्ञान शैक्षणिक सहल जिल्हा परिषद प्रांगणातून निघाली. या विज्ञान सहलीला परिक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. मा.जिल्हाधिकारी व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सहलीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी खूप आनंदी होते. त्यांना सहलीची उत्सुकता लागलेली होती. विमानाने प्रवास करून अंतरिक्ष केंद्र श्रीहरी कोट्टा येथे उपग्रह प्रक्षेपणाचा

डायरी राघुच्यावाडीची, विज्ञान सहल, विमानभरारी

विमानभरारी श्रीहरीकोटा

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. संशोधनवृत्तीचा विकास व्हावा. विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी. शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी. याहेतूने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची अंतरिक्ष केंद्र,श्रीहरिकोटा येथे विमानाने विज्ञान सहल आयोजित केली जाणार आहे.  या विज्ञान सहलीसाठी जि.प.प्रा.शाळा राघुचीवाडी या शाळेतील प्रतिभावंत, प्रज्ञावंत,सर्जनशील विद्यार्थ्यींनी कु. भक्ती दर्लिंग बेलदार हीची

डायरी राघुच्यावाडीची

राघुचीवाडी येथे शहीद जवान आनंद गेजगे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे व स्मारकाचे अनावरण सोहळा संपन्न

शहीद जवान आनंद गेजगे गडचिरोली (अहेरी) या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) कार्यरत असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरूंग स्फोटात त्यांना विरमरण आले होते. त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे व स्मारकाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.आमदार कैलास पाटील, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडन्ट मा.विशाल कोरे, माजी नगरसेवक

Scroll to Top