डायरी राघुच्यावाडीची

डायरी राघुच्यावाडीची, बालआनंद मेळावा

बालआनंद मेळावा

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा, त्यांना जीवन व्यवहारातील कौशल्य अवगत व्हावी, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी शाळेत २१ डिसेंबर रोजी शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या बालआनंद मेळाव्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे,भाजीपाल्यांचे विविध स्टॉल लावले होते. पालकांनी, गावकऱ्यांनी या स्टॉलला भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.  विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थांची, भाजीपाल्याची जवळपास 14 […]

डायरी राघुच्यावाडीची

मुलाखत ऐकण्यात रंगली मुले

स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यापक विद्यालय धाराशिव येथील छात्राध्यापक अमोल घाटे यांनी आज महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,श्री. समाधान शिकेतोड यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत अतिशय प्रेरणादायी झाली.  मुलाखतीच्या माध्यमातून शिकेतोड सरांनी त्यांचा शैक्षणिक प्रवास मांडला. शाळेत राहिलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ज्ञानरचनावाद, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, सहशालेय उपक्रम, प्रकल्प, ग्रंथालय, वाचनाचे महत्त्व याबाबत त्यांनी

डायरी राघुच्यावाडीची

राघुच्यावाडी शाळेतील विद्यार्थिनीची कविता किशोर मासिकात प्रकाशित

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ (बालभारती) मार्फत किशोर मासिक प्रकाशित केले जाते. किशोर मासिकातून उत्तम बालसाहित्य विद्यार्थ्यांना वाचायला मिळते. शालेय विद्यार्थ्यांना हे मासिक खूप आवडते. या मासिकांमधून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती ला संधी दिली जाते. राज्यातील विद्यार्थ्यांच्या कविता या मासिकात प्रकाशित होत असतात. राघुचीवाडी शाळेत दर महिन्याला किशोर मासिकाचे  ४४ अंक येतात. सर्व विद्यार्थी आवडीने

डायरी राघुच्यावाडीची

बालआनंद मेळाव्यात मुलांनी केली धमाल मजा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेत आज बालआनंद मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान यावे. त्यांनी तार्किक विचार करावा. सहकार्यवृत्ती वाढीस लागावी. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा. यासाठी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी बालआनंद मेळाव्यात भाजी मंडई भरविली होती. भाजी मंडई मध्ये विविध पालेभाज्या विकण्यासाठी आणल्या होत्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.

उपक्रम, डायरी राघुच्यावाडीची, मराठी भाषा

राघुच्यावाडीच्या मुलांनी पाठवली दिल्लीला पत्रे

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त पत्रलेखन उपक्रम राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्ती जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” दि. १४ जानेवारी २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा संवर्धन व जतन व्हावे यासाठी राज्यभर विविध उपक्रम राबविले जातात. जिल्हा

डायरी राघुच्यावाडीची

व्हाट्सअप पोल

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांना अध्ययन अनुभव दिल्यामुळे आज मुले गतीने शिकत आहेत. माझ्या वर्गात इंटर ऍक्टिव्ह बोर्ड आहे. या बोर्डच्या साह्याने विविध विषयातील अवघड संकल्पना मुलांना समजून द्यायला सोपे जाते. मुलांना गतीने शिकण्यासाठी या बोर्डचा उपयोग होत आहे. अलीकडेच मी शिष्यवृत्तीच्या ग्रुपवर व्हाट्सअपमधील व्हाट्सअप पोल च्या मदतीने मुलांना बहुपर्यायी प्रश्न देत आहे. मुले त्या प्रश्नाची उत्तरे

डायरी राघुच्यावाडीची

सूक्ष्मदर्शकातून काय दिसतंय ?

सूक्ष्मदर्शक हे डोळ्यांना प्रत्यक्ष न दिसणारी सूक्ष्म वस्तू पाहण्याचे उपकरण आहे.विज्ञानाच्या अनेक शोधांमध्ये सूक्ष्मदर्शकाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सूक्ष्मदर्शकातून वेगवेगळ्या स्लाईड दाखविल्या. मुलांनी त्या स्लाईड कुतूहलाने पाहिल्या. सूक्ष्मदर्शकातून अतिसूक्ष्म बाबी मोठ्या दिसत होत्या. ते पाहून मुलांना खूप आनंद वाटला.

डायरी राघुच्यावाडीची

इंग्रजी वर्तमानपत्र पाहिलंय का?

मुलांना विचारलं, “तुम्ही इंग्रजी वर्तमानपत्र पाहिलं का?” मुलं म्हणाले,”नाही.”  मुलांना इंडियन एक्सप्रेस इंग्रजी वर्तमानपत्र दाखवलं. मुलं कौतुकान हे वर्तमानपत्र पाहू लागले. मुलांना हे वर्तमानपत्र वाचायला दिलं. मुलं बातम्यांची शीर्षक वाचण्याचा प्रयत्न करू लागली. ओळखीचे शब्द शोधू लागली. वर्तमानपत्रातील चित्र पाहू लागली. काही वाक्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागली.मुलांनी इंग्रजी वर्तमानपत्र वाचण्याचा आनंद घेतला.

डायरी राघुच्यावाडीची

किशोरचा दिवाळी अंक आला

आमच्या शाळेतील मुलांसाठी आम्ही किशोरचे ४१ विद्यार्थ्यांची किशोर मासिकाची वर्गणी भरली होती. दर महिन्याला हे अंक नियमित मिळत आहेत. हे अंक मुले आवडीने वाचतात. किशोरचा दिवाळी अंकाची मुले आतुरतेने वाट पाहत होती. एकदाचे हे अंक आले. अंक पाहून मुले खुश झाली. या वर्षीचा दिवाळी अंक जीवनकौशल्यावर आधारित आहे. अंकातील बालसाहित्य वाचायला मुले उत्सुक होती. बालदिनाच्या

Scroll to Top