नवोपक्रम स्पर्धेतील यशस्वी शिक्षकांचा गुणगौरव

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून दरवर्षी वेगळ्या वाटेने जाणा-या,आगळा-वेगळा विचार करणा-या,धडपणा-या व उत्कृष्टतेचा ध्यास असणा-या शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा आयोजित केली जाते.
सन-2018-2019 मधील नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तरावर प्राथमिक गटातून बापू काळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजकल्ला(प्रथम),आश्राजी कावळे(व्दितीय) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी, विनोद कांबळे(तृतीय) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुलेवस्ती, रंजना स्वामी(उत्तेजनार्थ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्री, मंजुषा स्वामी(उत्तेजनार्थ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किणी, माध्यमिक गटामधून प्रकाश यादगिरे,(प्रथम) छत्रपती शिवाजी हायस्कूल,
सुकटा, सोपान पवार,  (व्दितीय),विद्याभवन हायस्कूल कळंब या यशस्वी झालेल्या उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान मा.डॉ.प्रताप काळे,उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद,डॉ.आय.पी.नदाफ,प्राचार्य, DIECPD,उस्मानाबाद,मा.राजेंद्र गिरी,वरिष्ठ अधिव्याख्याता,मा.डाॅ.प्रभाकर बुधाराम,विभाग प्रमुख संशोधन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मा.डाॅ.प्रताप काळे,उपजिल्हाधिकारी यांनी  प्रेरणादायी मार्गदर्शन केले.तसेच उपक्रमशील शिक्षकांच्या रचनात्मक कार्याचे कौतुक केले. यावेळी प्रमुख अतिथी अधिव्याख्याता मा.नारायण मुदगलवाड मा.सय्यद अख्तर मा.बिरप्पा शिंदे,मा.अर्चना नलावडे,मा.सुचित्रा जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.अर्चना नलावडे, अधिव्याख्याता व श्री.समाधान शिकेतोड,विषय सहायक यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व अधिकारी,विषय सहायक,कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top