डायरी राघुच्यावाडीची

डायरी राघुच्यावाडीची

ॠच्याचं चित्र

काल इयत्ता चौथीतील ॠचानं एक छान चित्र काढून दाखवलं.दिवाळी कशी साजरी केली?या संदर्भात चित्र होतं. या चित्रात तिनं घर,पणत्या,आकाशकंदील,ती अन् तिचा भाऊ असं काढलेलं होतं. पण तिच्या चित्राला पाय दिसत नव्हते.मग मी तिला विचारलं, “अगं चित्राला पाय दिसत नाहीत.” त्यावर ती म्हणाली,” अहो सर,पाय झाकून गेलेत.” मुलं कशी विचार करतात. किती चिकित्सक व सर्जनशील पातळीवर […]

डायरी राघुच्यावाडीची

मुलांमधील सुप्त गुण

आज माझ्या दुसरीच्या वर्गातील प्राजक्ताचे वडील भेटायला आले होते. प्राजक्ता बरेच दिवस शाळेत अनुपस्थित होती. त्यामुळे ते भेटायला आले होते. ते भेटायला आल्याचा मला खूप आनंद झाला कारण मी या शाळेत रुजू झाल्यापासून आतापर्यंत माझ्या वर्गातील पालक मला भेटायला आले नव्हते.  शिक्षक-पालक भेटीतून शिक्षक व पालकांचा नियमित संवाद व्हायला हवा. त्यामुळे मुलांच्या शिकण्यातील गती, प्रगती

डायरी राघुच्यावाडीची

घड्याळ गप्पा

घड्याळातील वेळ मुलांना समजावी यासाठी वर्गात घड्याळ हवं. यासाठी वर्गात नवीन घड्याळ लावायचं ठरवलं होतं. पण राहून गेलं होतं. बायकोनं ऑनलाइन घड्याळ मागवून घेतलं व मला दिलं.  वर्गात घड्याळ लावल्यावर मुलं खूश झाली. घड्याळात किती वाजले यावर चर्चा करू लागली.काही मुलांना घड्याळातील वेळ अचूक समजत नव्हती. आता मुलं घड्याळातील वेळ त्यांच्याच मित्राच्या मदतीनं समजून घेत

डायरी राघुच्यावाडीची

खास सेल्फी

माझ्या चौथीच्या वर्गातील विवेक याने ३० पर्यंत पाढे पाठांतर केले.त्याबद्दल त्याच्यासोबत खास सेल्फी काढली. मुलांना दिवाळीच्या सुट्टीपर्यंत ३० पर्यंत पाढे पाठांतर करण्याचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट विवेकनं पहिल्यांदा पूर्ण केलं. बरीच मुले उद्दिष्टाच्या जवळपास आली आहेत. स्वतः पाढेही तयार करतात.गणितातील सर्व क्रिया उत्तम करतात. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मुलांची अध्ययन क्षती झाली होती. ती आता भरून

डायरी राघुच्यावाडीची

ग्रंथालय समृद्धीकरण

आमच्या शाळेच्या ग्रंथालयात नवनवीन पुस्तकांची भर घालणे सुरू आहे. लोकसहभाग,शिक्षकसहभागातून काही उत्तम पुस्तकं शाळेच्या ग्रंथालयात दाखल झाली आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ (बालभारती) पुणे यांच्यामार्फत प्रकाशित किशोरचे १४ खंड व इतर पुस्तके ग्रंथालयात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी ही पुस्तके उपयुक्त आहेत. या पुस्तकांच्या माध्यमातून परिपाठात प्रकटवाचन, अभिवाचन, पुस्तक परिचय

GIRL EDUCATION, डायरी राघुच्यावाडीची

सर,मी कविता लिहिते

 आज सकाळी शाळे गेल्यावर काल जिल्हा परिषदेत संपन्न झालेल्या कार्यशाळेबद्दल चर्चा करत होतो.सकाळची स्वाक्षरी हजेरीपटावर केली.तेवढ्यात एक मुलगी कार्यालयात आली.तिने स्वत:चा परिचय दिला.सर,मी M.Sc केली आहे.सध्या एमपीएससी ची तयारी करत आहे.मी काही कविता केल्या आहेत.त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत.मला खर तर खूप आनंद वाटला की या गावातील मुली उच्च शिक्षण घेत आहेत.मुलीनी शिकायला हवं.तिच्या कुटुंबाविषयी जाणून

डायरी राघुच्यावाडीची

वाचनालय उपक्रम

काल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या आमच्या शाळेत सर्व शिक्षकांनी मिळून शाळेतील ग्रंथालयातील पुस्तके एकत्र केली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत त्याची विभागणी केली. विद्यार्थ्यांच्या वयोगटाुसार भाविश्वानुसार पुस्तके वेगवेगळी केली. शाळेतील ग्रंथालयात खूप सारी जुनी पुस्तके होती. नुकतीच मी एनबीटीची पुस्तके शाळेला भेट दिलेली होती ती पुस्तके एकत्र केली. वर्ग शिक्षकांना ती पुस्तके सुपूर्द केली.

डायरी राघुच्यावाडीची, यशोगाथा

यशला शाळेत आणण्यात यश आलं

 कोरोनाच्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या; परंतु काही मुले शाळेत येत नव्हती. या मुलांना शाळेत नियमित आणण्याचे आव्हान होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघूचीवाडी ता.जि उस्मानाबाद या माझ्या शाळेतील  शाळेत न येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शाळेत कसे आणले याची ही यशोगाथा. कोरोनाच्या कालावधीत शाळा न भरल्यामुळे मुलांची अध्ययन क्षती खूप झाली. मुलांच्या मुलभूत संकल्पना, क्षमता विकसित झाल्या

Girls Education, डायरी राघुच्यावाडीची

मुलीचं लग्न करून द्या.

माझ्या वर्गात काल एक आजीबाई आल्या.मी मुलांना अध्यापन करत होतो.त्यांनी वर्गात येऊन थेट व्यथा मांडायला सुरूवात केली. ‘टि.सी द्या हो’ ‘त्याला चार मुली हायत्या,एक एकर जमीन…कसं जगायचं…सांगा.’ वर्गातील मुले हे पाहू लागली.मुलांसमोर हा संवाद नको म्हणून वर्गाच्या बाहेर आलो.मला मुळ समस्या समजून घ्यायची होती.म्हणून काय झालं?काय अडचण आहे.नीट सांगा…असं म्हणत होतो.ती आजी माझ्या तिसरीच्या वर्गातील

डायरी राघुच्यावाडीची

समृद्ध शाळेच्या दिशेने

माझ्या शाळेत भौतिक सुविधांची कमतरता आहे. शाळेला मोठे मैदान आहे; परंतु पक्क्या भिंतीचे वॉल कंपाऊंड नाही. शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप आहे; पण शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे शाळेत वृक्षारोपण, बाग-बगीच्या तयार करायला अडचण निर्माण होते.शाळेला पक्क्या भिंतीचे वॉल कंपाऊंड असणे खूप गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम करताना अनेक

Scroll to Top