चावडी वाचन

आज आमच्या जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री शाळेत म.गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक बुरंगे सर यांनी या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले.

चिमुकल्यांनी भाषणे केली.मी  म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

आज चावडीवाचन ही घेण्यात आले. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांतील पाठाचे योग्य आरोह अवरोहासह गतिसह प्रकटवाचन केले.इंग्रजी चे संवाद सादरीकरण मुलांनी करून दाखवले. कविता हावभावासह गाऊन दाखवल्या. 

पालकांनी गणितातील काही व्यवहारिक उदाहरणे मुलांना विचारली. मुलांनी अचुक उत्तरे दिली. स्वच्छतेच्या सहा संदेशाचे वाचन करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top