उपक्रम

उपक्रम, डायरी राघुच्यावाडीची, मराठी भाषा

राघुच्यावाडीच्या मुलांनी पाठवली दिल्लीला पत्रे

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त पत्रलेखन उपक्रम राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्ती जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” दि. १४ जानेवारी २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा संवर्धन व जतन व्हावे यासाठी राज्यभर विविध उपक्रम राबविले जातात. जिल्हा […]

Baramati, Innovation, उपक्रम, फेलोशिप

घरोघरी ग्रंथालय

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई मार्फत राज्यातील प्रयोगशील शिक्षकांना पाठ्यवृत्ती (फेलोशिप) दिली जाते. या सर्व फेलोंची तीन दिवसीय कार्यशाळा बारामती येथे संपन्न झाली. राज्यातील प्रयोगशील शिक्षकांचे उपक्रम समजून घेता आले. बालाजी जाधव सातारा, विनीत पद्मावार गडचिरोली, सचिन देसाई कोल्हापूर, अण्णासाहेब घोडके बीड, मृणाल गांजळे पुणे अशा अनेक प्रयोगशील शिक्षकांचे उपक्रम अफलातून आहेत. या सर्वांचे सादरीकरण अनुभवता

उपक्रम, डायरी राघुच्यावाडीची

राघुचीवाडी शाळेत बालआनंद मेळावा संपन्न

माजी शिक्षण संचालक वि.वि. चिपळूणकर यांनी असे म्हटले हे की ‘शाळा हे उपक्रमांचे मोहोळ बनायला हवे’. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी शाळेत विविध सहशालेय उपक्रम, प्रकल्प राबविण्यात येत असतात. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी जीवन व्यवहारातील ज्ञान,कौशल्य मिळवीत असतात. त्यांचं शिकणं आणि जगणं एक होत असतं. अशा उपक्रमांच्या माध्यमातून विविध विषयांमधील विद्यार्थ्यांच्या

उपक्रम

राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा

उस्मानाबाद येथे राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा सुरू आहेत. खो खो च्या राष्ट्रीय स्पर्धा प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य मिळतंय. अतिशय उत्साहात स्पर्धा संपन्न होत आहेत. काल आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही सकाळच्या सत्रातील दोन सामने दाखवले. मुलांना खूप आनंद मिळाला. मा.रामलिंग काळे, शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प. उस्मानाबाद यांनीही आमच्या मुलांसोबत सामन्याचा आस्वाद घेतला. खो-खो चा केरळ×महाराष्ट्र हा रंगतदार सामाना

उपक्रम

लेखक आपल्या भेटीला

विद्यार्थ्यांना लेखकाशी संवाद साधता यावा, त्यांच्या अभिव्यक्तीला धुमारे फुटावेत,त्यांना सर्जनशील लेखन करता यावे यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘परीसस्पर्श- लेखक आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम औरंगाबाद जिल्ह्यात २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. लेखक म्हणून या कार्यक्रमाला मला आमंत्रित करण्यात आलेले होते. मुलांसोबत संवाद

उपक्रम

आंतरजाल उपक्रमांच्या माध्यमातून समृद्धीकरण

नववी कुमारभारती या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील सर्व पाठ कविता, व्याकरण, उपयोजित लेखन या घटकावर राज्यातील मराठी विषयाच्या उपक्रमशील माध्यमिक  शिक्षकांनी महाराष्ट्र मराठी अध्यापक मंडळाच्या माध्यमातून झूम ॲपच्या आधारे सादरीकरण केले.पाठाच्या सादरीकरणाचे व्हिडिओ एकत्रित संकलित करून त्याचे ई- बुक तयार करण्यात आले. प्रयोगशील माध्यमिक शिक्षकांनी एकत्र येऊन शिक्षकांच्या समृद्धीसाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविला हा एक

उपक्रम

माझं पुस्तक

 बालदिनानिमित्त मुलांच्या सृजनात्मक लेखनाच्या उपक्रमाची बातमी दैनिक दिव्य मराठी या लोकप्रिय दैनिकात प्रकाशीत केल्याबद्दल दिव्य मराठी वर्तमान पत्राचे मनापासून धन्यवाद. मुलांच्या भाषा समृद्धिसाठी, स्व-अभिव्यक्ती कौशल्याचा विकास व्हावा यासाठी मी प्रयत्नशील असतो. सतत विविध नवोपक्रम राबवत असतो. त्यामुळे मुले आता छान सृजनात्मक लेखन करू लागली आहेत. माझ्या वर्गातील वैष्णवी भोसले या विद्यार्थींनीने खुप कविता तयार केल्या

उपक्रम

ज्ञानी मी होणार

● उपक्रम – ज्ञानी मी होणार● ♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧ आज जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद येथे इयत्ता दुसरी,तिसरी, चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने परिक्षा दिली.प्रत्येक वर्गातुन प्रथम, द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर  बक्षिसे दिली जातात. शाळेच्या दर्शनी भागातील फलकावर दररोज सामान्य ज्ञानाचे दोन प्रश्न लिहले जातात.विद्यार्थी ते लिहून घेतात.परिपाठात ते प्रश्न विचारतात .

उपक्रम

आम्ही कविता लिहतो

आम्ही कविता लिहतो °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° आमच्या जि.प.प्रा.शाळा हाडोंग्री ता.भूम जि.उस्मानाबाद या शाळेत परिपाठात विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांबाहेरील किंवा स्वलिखीत कविता सादर करायची असा उपक्रम सुरू केला होता. आज दिव्य मराठी दैनिकात आमच्या शाळेतील इयत्ता चौथीच्या  विद्यार्थ्यांची कविता आली. राबवलेल्या उपक्रमाचे समाधान वाटले. ••••••••••••••••••••••••••••••••••• उपक्रमाबद्दल थोडेसे •••••••••••••••••••••••••••••••••• 📌 इयत्ता तिसरी च्या पाठ्यपुस्तकात कविता तयार करण्याचा उपक्रम दिला आहे. परंतु

उपक्रम

शारीरिक शिक्षण

शारीरिक शिक्षण 📌 आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयातील इयत्ता तिसरी साठी आज विविध मुलभूत हालचाली साठी ढांग टाकणे हा उपक्रम घेतला. 📌 हे कौशल्य धावण्यासारखेच आहे,मात्र या हालचालीसाठी पाय लांब टाकावे लागतात. 📌 मुलभूत हालचालीतूनच मुलांच्या विविध हालचाली विकसित होतात. त्यामुळे विविध हालचालींचा पाया मुलभूत हालचाली हाच आहे. 📌 मुलांनी आनंददायी पद्धतीने हे कौशल्य आत्मसात

Scroll to Top