Author name: Samadhan Shiketod

शैक्षणिक मासीक

पालकनिती

पालकनिती या मासीकाची मी दर महिन्याला वाट पाहत असतो.याचा प्रत्येक अंक नाविन्यपूर्ण,पालकाचं पालकत्व जागृत करणारा असतो. फेब्रुवारीचा अंक मुलं आणि तंत्रज्ञान या विषयावर आहे.निमखेडा येथे प्राथमिक शाळेवर असणारे शिक्षक अनिल सोनुने यांचा तंत्रभरारी हा लेख उत्तम आहे. सुनिता कुलकर्णी यांनी आपल्या लेखातून ग्रॅनी क्लाउड,होल इन द वाॅल या नविन संकल्पनेतून स्वरचित अध्ययन अनुभव हे नविन […]

arvindguptatoys.com

आनंददायी विज्ञान खेळणी

हसतखेळत आनंददायी विज्ञान खेळणी हा अरविंद गुप्ता यांच्या बद्दलचा लेख आजच्या महाराष्ट्र टाईम्सच्या संवाद पुरवणी मध्ये वाचा. आयुकाच्या मुक्तांगणासाठी तर त्यांनी मुलांसाठी अनेक  आनंददायी विज्ञान खेळणी बनवली.त्यांच्या संकेतस्थळावर याबाबत माहीती उपलब्ध आहे. महत्वाच्या लिंक मध्ये संकेतस्थळ दिलेले आहे.

प्रेरणादायी उपक्रम

शाळा गीत…….

प्रसिद्ध कवि सुरेश सावंत यांनी त्यांच्या शाळेसाठी विद्यालय गीत लिहलय….हे मी नुकतचं फेसबुकवर पाहीलय….खुपच छान…विद्यापीठाला,महाविद्यालयाला जसं एक गीत असत…अगदी तसच…त्यांनी त्यांच्या विद्यालयासाठी  लिहलय हे गीत… मीही आमच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी गीत लिहणार आहे……

जि.प. शाळेची सहल विमानाने गेली.

चिमुकल्यांची विमानभरारी….

जि.प.प्रा शाळा कन्नड ता. अक्कलकोट जि.सोलापूर या शाळेची सहल विमानाने बंगळूरला जाऊन आली. या शाळेला मी अभिनंदन पत्र लिहलं होत.नंतर मला त्यांचा फोन आला होता.माझ्या अभिनंदनामुळे त्यांना खुप आनंद झाला होता.मुलांच्या आनंदासाठी आपल्या पगाराच्या पैशातून सहल घेऊन जाणारे हे गुरूजण खरोखरचं महान आहेत. विमान सफरीचे अनुभव मुले लिहून पाठवणार आहेत.

प्रशिक्षण कसे असावे?

प्रशिक्षण…..

प्रशिक्षण….. 1)प्रशिक्षणासाठी योग्य स्थळ निवडावे.भौतिक सुविधा असाव्यात. 2) 1)प्रशिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. उदा.प्रोजेक्टर,पि.पि.टी.इंटरनेट 3) प्रशिक्षण प्रमुख,सत्र समंत्रक, तज्ञ मार्गदर्शक यांच्या कामाची विभागणी असावी. 4)वरील सर्वाना MOT(Manegment of Training) चे प्रशिक्षण द्यावे. 5)तज्ञ मार्गदर्शकांची निवड परीक्षा व मुलाखतीतुन करावी. 6)प्रशिक्षण पुर्व व उत्तर प्रशिक्षणार्थ्याची चाचणी घ्यावी. 7)प्रशिक्षणासाठी तालुकास्तरावर  BIET तयार करावे. 8) तज्ञ मार्गदर्शकांची विषयानुसार

Uncategorized

जीवन शिक्षण कार्यशाळा

🌈✏ लेखन कार्यशाळा✏विभागीय जीवन शिक्षण लेखन कार्यशाळा लातुर येथे 29 जानेवारी ते 31जानेवारी या कालावधीत संपन्न झाली. कांदबरीकार प्रा.शेषेराव मोहीते,पत्रकार विकास गाढवे,कवि भारत सातपुते,कथाकार विलास सिंदगीकर,व्यंगचित्रकार प्रकाश घादगिने,इतिहास संशोधक विवेक सौताडकर या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.कार्यशाळेत कवि भारत सातपुते यांनी बाप या विषयावर कविता लेखन करून घेतले.या कार्यशाळेत मी तीन लेख लिहले.1)लेखन कार्यशाळेतील माझे अनुभव2) पुस्तक

Uncategorized

नमस्कार मित्रांनो ….

      आपला सर्वांचा सुसंवाद होण्यासाठी हा शिक्षण संवाद ब्लॉग….  सध्या ब्लॉग पूर्णत्वाकडे जात आहे . कृपया त्रुटी सांगाव्यात व मार्गदर्शन करावे.

Scroll to Top