विषय सहायक तुकाराम गरूडे यांना निरोप

राज्यातील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मुलांसोबत रचनात्मक काम केलेल्या,त्या त्या विषयाचे तज्ञत्व,समज असलेल्या उपक्रमशील शिक्षक,केंद्रप्रमुख,शिक्षण विस्तार अधिकारी यांची शासनाच्या विहीत कार्यपद्धतीनुसार विषय सहायक (महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- क) पदी प्रतिनियुक्ती  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत करण्यात आली होती.प्रतिनियुक्ती नंतर विषय सहायकांच्या सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञ सुबिर शुक्ल यांच्या सक्षमिकरण कार्यशाळा  संपन्न झाल्या. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी,गुणवत्ता विकासासाठी डायट मधील अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली विषय सहायक  सातत्याने नाविन्यपूर्ण काम करत राहिले.
 विज्ञान विषयाच्या गुणवत्ता वाढीसाठी श्री.तुकाराम गरूडे यांनी  उत्तम काम केले.आज त्याच्या कार्याचा गौरव सन्माननीय प्राचार्य,अधिव्याख्याता व विभागप्रमुख यांनी केला.अतिशय सुस्वभावी,नम्र,मनमिळाऊ असलेले श्री.तुकाराम गरूडे यांनी गेल्या तिन वर्षात जिल्ह्याच्या गुणवत्तावाढी खुप मेहनत घेतली.आज ते स्वतः विनंती अर्ज देऊन मुळ आस्थापनेवर जात आहेत.त्यानिमीत्ताने डायट मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना खुप खुप शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top