Uncategorized

Uncategorized

सर्जनशीलतेची रुजवात

  लेखन म्हणजे मनातील भावना,मत व्यक्त करणे होय. मुलाचे भाषा शिक्षण घडत असताना मुलं स्वलिपीकडून स्वलेखनाकडे जात असते. त्यामुळे पहिली, दुसरीच्या मुलांना श्रुतलेखन अचूक यावे हा आग्रह धरणे योग्य आहे काय ?  प्राथमिक स्तरावर  मुलांचे भाषाशिक्षण कशा पद्धतीने घडून येते याचा शास्त्रीय दृष्टीकोन समजून घ्यायला हवा.या अनुषंगाने श्रुतलेखन हवे का स्वलेखन या विषयाचा घेतलेला धांडोळा …. […]

Uncategorized

शिक्षक म्हणून 20 वर्षे सेवा पूर्ण

प्राथमिक शिक्षक म्हणून २० वर्षे सेवा पूर्ण झाली. २००३ ते २०२३ हा शिक्षक म्हणून प्रवास आनंदायी आहे.मुलांसोबत सर्जनशील काम करता आलं.  नौकरीच्या सुरूवातीलाच नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागात केलं. बहुभाषिक शिक्षणाचं आव्हानात्मक काम करताना बोलीभाषा-प्रमाणभाषा शब्दकोश तयार केला. यामुळे मुलांना घरच्या भाषेकडून माध्यम भाषेकडे घेऊन जाता आले. यावेळी टिचर पुस्तकाकडून प्रेरणा मिळाली अन् काम करत गेलो.

Uncategorized

आचार्य डॉ. सुरेश सावंत

 महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालसाहित्यिक, चरित्रकार, संशोधक, समीक्षक, विचारवंत डॉ. सुरेश सावंत यांचा गौरव ग्रंथ वाचण्याची खूप उत्सुकता होती. नांदेड येथील इसाप प्रकाशनाचे प्रकाशक श्री. दत्ता डांगे यांनी आचार्य डॉ. सुरेश सावंत हा गौरवग्रंथ मला पोस्टाने पाठविला. या गौरव ग्रंथाचे संपादन लेखक संदीप काळे यांनी केलेले आहे. हा गौरवग्रंथ इसाप प्रकाशनाने प्रकाशित केला असून प्रसिद्ध साहित्यिक श्रीपाल

Uncategorized

साहित्यिक समजून घेताना- सचिन बेंडभर

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा साहित्यिक,जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडी येथील प्रयोगशील शिक्षक श्री.सचिन बेंडभर यांची ‘साहित्यिक समजून घेताना’ या कार्यक्रमांतर्गत मुलाखत संपन्न झालेली आहे. शेतीमातीच्या कविता लिहणारे,विनोदी बाज असणा-या कथा लिहणारे श्री.सचिन बेंडभर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील लेखनाची तीन पुस्तके संपादीत केलेली आहेत. कोणतीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना, अठ्ठेचाळीस पुस्तके लिहणा-या,महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे साहित्यिक पुरस्कार मिळविणा-या,पाठ्यपुस्तकातील कवी युवा

Uncategorized

वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम

सरमकुंडी शाळेतील विद्यार्थी झाले किशोरचे वर्गणीदार वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम   बालभारतीकडून दरमहा ‘किशोर मासीक‘ विद्यार्थ्यांसाठी प्रकाशीत केले जाते. विद्यार्थी किशोर मासीकाचे आवडीने वाचन करत असतात.मुलांना समृद्ध असं वाचनसाहित्य वाचायला मिळावं.यासाठी सरमकुंडी गावातील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पाचवी ते सातवीमधील सर्व विद्यार्थ्यांची  वर्गणी “माझी सरमकुंडी” या गटातील मित्रमंडळींनी भरली.ही  संकल्पना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक समाधान शिकेतोड यांनी

Scroll to Top