डायरी राघुच्यावाडीची

डायरी राघुच्यावाडीची

स्वयंशासन दिन

परवा आमच्या शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.इयत्ता आठवीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापन केले. शाळेविषयी,शिक्षकांविषयी स्वतःचे अनुभव सांगितले. या स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आयुष्यात पुढे जाण्याची उर्मी,प्रेरणा मिळते.या दिवसाची आठवण त्यांना सदैव राहते.आजही आपल्याला शालेय जीवनातील स्वयंशासन दिन आठवतो.

डायरी राघुच्यावाडीची

मुलांच्या सुप्त गुणांना फुलू द्या

आज माझ्या दुसरीच्या वर्गातील प्राजक्ताचे वडील भेटायला आले होते. प्राजक्ता बरेच दिवस शाळेत अनुपस्थित होती. त्यामुळे ते भेटायला आले होते. ते भेटायला आल्याचा मला खूप आनंद झाला कारण मी या शाळेत रुजू झाल्यापासून आतापर्यंत माझ्या वर्गातील पालक मला भेटायला आले नव्हते.  शिक्षक-पालक भेटीतून शिक्षक व पालकांचा नियमित संवाद व्हायला हवा. त्यामुळे मुलांच्या शिकण्यातील गती, प्रगती

डायरी राघुच्यावाडीची

माझी शाळा माझा अभिमान

गेले पाच वर्ष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद या ठिकाणी शिक्षक प्रशिक्षण म्हणून कार्यरत होतो. या कालावधीत जिल्ह्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या. मराठी विषयाचे विविध पथदर्शी प्रकल्प उपक्रम राबविले. नुकतीच मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी तालुका उस्मानाबाद या शाळेवर नियुक्ती मिळालेली आहे. नव्या उत्साहाने उमेदीने या शाळेवर काम सुरू केलेले आहे.कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर

Scroll to Top