शाळाबाह्य मुले अन् आम्ही
आज प्राचार्य महोदयासोबत “शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम” या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये उपस्थित होतो. एक मार्च पासून शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची मोहीम सुरू राहणार आहे. या मुलांचा शोध या मोहिमेतून घेतला जाणार आहे.या बैठकीमध्ये या विषयावर चिंतन झाले.शासन निर्णयावर चर्चा करण्यात आली.या मोहिमेतून तीन ते अठरा या वयोगटातील शाळाबाह्य मुलांना शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. […]
